शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (07:44 IST)

नवनीत राणा यांना ‘सी’ग्रेड अभिनेत्री म्हटलं आहे

navneet rana
उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळाली. शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणा यांना ‘सी’ग्रेड अभिनेत्री म्हटलं आहे. तसेच जेव्हा बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबाला मातोश्रीवर नमाज पठणास सांगितलं तेव्हा राणा ‘सी’ग्रेड फिल्म करण्यात बिझी होत्या, अशी जहरी टीका केली. घाडी मंगळवारी (६ सप्टेंबर) मुंबईत बोलत होत्या.
 
संजना घाडी म्हणाल्या, “तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत. बाळासाहेबांचे राहिले नाहीत. मात्र, याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदाही केला होता.”