मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (17:08 IST)

महिलेच्या अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी NCB चा अधिक्षक दिनेश चव्हाणला अटक

नवी मुंबईत राहणाऱ्या एनसीबीचा अधिक्षक दिनेश चव्हाण याला परळी रेल्वे पोलिसांनी महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणी अटक केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून या अधिक्षकाविरोधात प्रवासादरम्यान विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची छेड काढून तिच्यासोबत विकृत चाळे केल्याचा आरोप एनसीबीचा अधिक्षक दिनेश चव्हाण विरोधात आहे. या अधिकाऱ्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
 
कंट्रोल ब्युरो च्या अधिक्षक असलेले दिनेश चव्हाण हे न्यायालयीन कामासाठी हैद्राबाद येथे गेले होते. हैद्राबाद पुणे अशा परतीच्या रेल्वे प्रवासादरम्यान त्याने २५ वर्षीय प्रवासी महिलेचा विनयभंग केला. महिलेचा विनयभंग करत अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याचा आरोप दिनेश चव्हाणवर करण्यात आला आहे. त्यामुळेच परळी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दिनेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.
 
दिनेश चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे, व त्यांच्यावर मानसिक आजारावर उपचार सुरू असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. या २५ वर्षीय प्रवासी महिलेनी प्रवासा दरम्यान छेड काढल्याच्या प्रकरणाची तक्रार केली होती. आपल्या अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी तिने एनसीबीचे अधिक्षक दिनेश चव्हाण विरोधात तक्रार केली होती. या महिलेच्या तक्रारीनंतरच परळी पोलिसांनी दिनेश चव्हाणला अटक केली आहे. या अधिकाऱ्याला कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती जीआरपी औरंगाबादचे पोलिस अधिक्षक एम पाटील यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.