सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (16:12 IST)

आंदोलनाला विरोध करणारे आज स्टेजवर उपस्थित आहे : नारायण राणे

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मंचावर नारायण राणे यांनी जोरदार भाषण ठोकलं. यावेळी  कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांवर त्यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांच्या समोरच जोरदार आसूड ओढले. राणेंच्या भाषणाचा हिशेब मुख्यमंत्र्यांनी आपली वेळ येताच चुकता केला. कोकणचा कॅलिफोर्निया करु म्हणणारे अनेकजण आले आणि गेले, पण बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं, कॅलिफोर्नियालाही अभिमान वाटेल, असं कोकण आपण करु, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर पलटवार केला.  आंदोलनाला विरोध करणारे आज स्टेजवर उपस्थित आहे, असं म्हणत सेना नेत्यांवर प्रहार केला. 
 
“एवढे वर्ष विमानतळाला का लागले? आम्ही कोकणचं कॅलिफोर्निया करु असे काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करु. बाकीच्या गोष्ट आदित्यने सांगितल्या आहेत. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं आणि मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेल”, असं म्हणत त्यांनी राणेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
 
सिंधिया महाराष्ट्राच्या अनेक विमानतळांबद्दल भरभरुन बोलले. तुमचं अभिनंदन करतो. इतक्या लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार आपण जपलात. मला वाटत होतं की मी केंद्रीय मंत्री आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात. पण इथे राजकारण येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच सिंधिया विमानतळाबद्दल अधिक तळमळीने बोलले, असं मुद्दामहून सांगत त्यांनी राणेंवर निशाणा साधला. आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे, आदळआपट करण्याचा नाही. आपलं कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. आपण गोव्याच्या विरोधात नाही. पण आपलं वैभव कमी नाही. उलट आपण काकणभर सरस आहोत. कमी अजिबात नाहीत.