गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2023 (07:25 IST)

राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे

devendra fadnavis
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे बडे नेते कर्नाटकात जोरदार प्रचार करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटकात जाऊन प्रचार करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात प्रचारसभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे, कर्नाटकात काय करणार, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.
 
सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभेत बोलताना, इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor