शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (10:12 IST)

'अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो ,जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेते अक्षय कुमार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली

jitendra awahad
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेते अक्षय कुमार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केलीय. अक्षय कुमारचा नवीन सिनेमा 'सम्राट पृथ्वीराज' प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुलाखत देत असताना अक्षय कुमारने वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.
 
या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, "अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो आणि कोट्यवधी कमवतो. पृथ्वीराज चौहान सर्वांना माहिती आहेत. इतिहासात त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. ते कोण होते हे तुम्हाला माहिती नसले तर तुम्ही गुगल करा. पृथ्वीराज चौहान 26 वर्षांचे असताना घोड्यावर बसले आणि अक्षय कुमार 50 चा आहे."

अक्षय कुमारचा उल्लेख त्यांनी 'मूर्ख माणूस' असाही केला आहे. 
जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारने 2011 साली इंधनांच्या वाढलेल्या किमतींवरून केलेलं ट्वीट सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं.
 
मनमोहन सिंग यांचं सरकार असताना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर अक्षय कुमारने ट्वीट केलं होतं. 'पेट्रोलचे दर वाढण्याआधी मुंबईकरांनी पेट्रोलपंपावर रांगा लावल्या आहेत. त्यामुळे मला रात्री घरी जाण्यासही उशीर झाला.' हे ट्वीट समोर आणत जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारला काही प्रश्न विचारले होते.
 
"अक्षय, तू ट्वीटरवर सक्रिय नाहीस का? तू कार वापरणं बंद केलंस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत."