शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (08:10 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं

jitendra awhad
ठाणे‘हर हर महादेव’ चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता विविध संघटनांकडून या चित्रपटावर आक्षेप घेतला जातोय. विशेष म्हणजे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं. यावेळी तेथील मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये प्रंचड हाणामारी देखील झाली. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मध्यस्थी केली. पण या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढल्यानंतर काही प्रेक्षकांनी मॅनेजरकडे तिकीटाचे पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मॅनेजर आणि काही प्रेक्षकांमध्ये बाचाबाची झाली. यातून एका प्रेक्षकाचे कपडे फाटल्याचं देखील बघायला मिळालं.