शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (07:53 IST)

“माझ्या बापाला मारणारा मास्टरमाइंड कोण होता?” पुनम महाजनांच्या प्रश्नाने चर्चा सुरू

poonam mahajan
मुंबई “मी तुम्हाला शकुनी म्हटल्यावर इतर पक्षातील लोक मला तू हे बोलणारी कोण, असा प्रश्न विचारतील. माझ्या घराबाहेर मोठी – मोठी पोस्टर्स लावतील. तुझ्या बापाला कोणी मारलं असेही विचारतील. माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहीत आहे. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता? तुम्ही सत्तेत होतात. तेव्हा तुम्ही हा मास्टरमाइंड का शोधला नाही?” असा प्रश्न भाजपच्या नेत्या, खासदार पूनम महाजन यांनी विरोधकांना उपस्थित केला आहे. वांद्रे येथील सभेला संबोधित करताना पूनम महाजन बोलत होत्या.
 
पुढे त्या म्हणाल्या, माझ्या बापाला कोणी मारलं हे मला माहीत आहे. प्रत्येकवेळी तो प्रश्न निर्माण केला जातो पण त्याचा काही फरक पडत नाही. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता हे शोधणं गरजेचं होतं. शिवसेना – भाजप – रिपाइंच्या युतीतून मी २०१४ आणि २०१९मध्ये मी खासदार झाले. त्याचा मला अभिमान आहे. जनतेने विश्वास देऊन निवडून दिलं. त्याचा अभिमान मला आहे. आमच्या मित्रपक्षाला जनमताचा का अभिमान नव्हता? असा सवालही त्यांनी केला. दोन भावात म्हणा, मित्रांमध्ये म्हणा युतीत भांडण झालं, महाभारत झालं असं तुम्ही म्हणता. हे महाभारत घडवणारे शकुनी कोण कोण होते? ते तुम्हाला माहीतच असेल. या शकुनींनी महाभारत रचलं आणि स्वत: सत्तेवर जाऊन बसले. २०१९ ते २०२२ दरम्यान दोन भावात महाभारत घडलं. जे घडलं ते आता घडलं, असंही त्या म्हणाल्या.
 
म्हणून भगवद्गीता वाचली..
लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी आपण शिवाजी महाराजांचे शिवभारत घडवणार आहोत. श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली होती. त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. महाभारतात अजून एक संवाद होता. श्रीकृष्ण आणि सारथी उद्धवाचा. त्याला उद्धव गीता म्हणतात. ती उद्धव गीता म्हणूनच वाचली जाते, असं त्यांनी सांगितलं. या महापालिकेच्या कुरुश्रेत्रात उतरायचंय म्हणून मी भगवद्गीता वाचली.
Edited by : Ratnadeep Ranshoor