शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (08:01 IST)

तलवार, गदा आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत शिंदे गटाच्या बैठकीत चर्चा

shinde
तलवार, गदा आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत शिंदे गटाच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र निर्णय झाला नसल्याचे समजते. निवडणूक आयोगाला कोणती तीन नावे आणि कोणती तीन चिन्हे सादर करायची याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार शिंदे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्याचे समजते. सोमवारी शिंदे गट याबाबत पत्रक काढून आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने ही पर्यायी नावे आणि चिन्हे सादर करण्याासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्या मुदतीच्या आधी शिंदे गट नावे आणि चिन्हे सादर करण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने यापूर्वीच ती सादर केलेली आहेत.
शिंदे गटाच्या बैठकीत अंधेरी पोटनिवडणुक लढवण्याबाबतही चर्चा झाली. ही जागा भाजपकडून जागा शिंदे गटाला मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी काही आमदारांनी या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.