शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (07:38 IST)

नैसर्गिक वायूची पाईपलाईन २०२३ च्या मध्यापर्यंत मुंबईहून नागपूरला पोहोचणार

gai gaspipeline
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (गेल) टाकण्यात येणारी नैसर्गिक वायूची पाईपलाईन २०२३ च्या मध्यापर्यंत मुंबईहून नागपूरला पोहोचणार आहे. पाईपलाईन समृद्धी महामार्गालगत टाकण्यात येत असून, ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) महामार्गाच्या निर्मितीसाठी कसाराजवळ ब्लास्टिंग करत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आमचे काम थांबले आहे. त्यानंतरही वेळेनुसार पाईपलाईन नागपूरला पोहोचणार असल्याची माहिती ‘गेल’च्या अधिकृत सूत्रांनी दिली. गेलची पाईपलाईन शहराजवळ आल्यानंतर नागपूरला पाईपद्वारे गॅस मिळू शकेल. बुटीबोरीतील उद्योगांनाही इंधन मिळणार आहे. हरियाणा सिटी गॅसला (एचसीजी) शहरात पाईप्ड नैसर्गिक वायूचे वितरण करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे आणि ते येथे पोहोचण्यासाठी गेलच्या पाईपलाईनची वाट पाहत आहे.
 
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) १,७५५ किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर-झारसुगुडा आणि नागपूर-जबलपूर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम ‘गेल’ला दिले आहे. या प्रकल्पाची किंमत ७,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई-नागपूर पाईपलाईनचा व्यास २४ इंच (२ फूट) आहे, तर नागपूर-झारसुगुडा पाईपलाईनचा व्यास १८ इंच आहे. मुंबई-नागपूर-झारसुगुडा पाईपलाईन महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतून जाणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor