मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (17:45 IST)

नव्या राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर

rajdhani express
नवी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांना जोडणारी आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार असून, कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाँसी आणि आग्रा कॅंटोन्मेटमार्गे दिल्लीला जाणार आहे. 
 
नवी राजधानी एक्स्प्रेस दर बुधवारी आणि शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल. तर नवी दिल्ली स्थानकावरून ही गाडी गुरुवारी आणि रविवारी सुटेल. दिल्ली ते मुंबई हे अंतर ही गाडी २० तासांमध्येच पूर्ण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी २.२० मिनिटांनी सुटेल. 
 
दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० मिनिटांनी ती दिल्लीला पोहोचेल. दिल्लीहून हजरत निजामुद्दीन स्थानकावरून ही गाडी ३.४५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेल. दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या गाड्या कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाँसी आणि आगरा कॅंटोन्मेट या स्थानकांवर थांबेल.