1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (08:59 IST)

राहुल यांच्या कॅण्डल मोर्चला गर्दी जमली पण .........

rahul gandhi
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रात्री १० वाजता ट्विट करत उन्नाव, कठुआ बलात्काराचा निषेध करण्यासाठी शांततेच्या मार्गाने इंडिया गेटवर कॅण्डल मोर्च काढत असून माझ्यासोबत सामील व्हा असं आवाहन केलं. त्याच्या या ट्विटनंतर इंडिया गेटवर कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. ही गर्दी पाहिल्यानंतर राहुल गांधींचा कॅण्डल मार्च यशस्वी झाल्याचं सांगण्यात येऊ लागलं. 
 
मात्र थोड्याच वेळात या मोर्चाचा फज्जा उडाला. कारण कार्यकर्ते आणि उपस्थित लोकांनी अत्यंत बेशिस्तपणे गर्दी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. निषेध करत न्यायाची मागणी करणं बाजूला राहील. जमलेल्या कार्यकर्ते आणि लोकानी राहुल गांधी, प्रियंका गांधी पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी करु लागले. त्यामुळे मोर्चा बाजूला राहिला.