1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (09:02 IST)

अहो आश्चर्यम, आता बिया नसलेली संत्री आणि मोसंबी

नागपुरमध्ये जगात प्रसिद्ध असलेल्या सीडलेस म्हणजेच बिया नसलेली संत्री आणि मोसंबीच्या नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. याबाबत नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थाने दावा केला आहे. या संस्थेने संत्रीच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा एकूण सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. या सर्व प्रजातींमध्ये फक्त एक किंवा दोन बिया असून, येत्या चार ते पाच वर्षात ही फळं विदर्भातील बाजारपेठेत दिसणार असल्याचं संशोधन संस्थेनं सांगितलं आहे.
 
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थाने एकूण सहा सिडलेस प्रजाती विकसित केल्यायत. संत्री फळामध्ये डेजी आणि पर्ल या दोन, तर मोसंबीच्या चार नव्या प्रजाती आहेत. विदर्भात डेजी प्रजातीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. तसेच संत्रीचे झाड जसे वाढेल तसेतसे उत्पादन देखील वाढेल, असे संशोधन संस्थेने सांगितले आहे. 
 
या मोसंबीमध्ये विकसित केलेल्या प्रजातींची नावं ब्लड रेड माल्टा, जाफा, वेस्टीन आणि हेमलीन अशी  आहेत. यातून शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल, तसेच त्यांच्या उत्पादनात वाढ होईल, असं संशोधन संस्थेने सांगितल आहे.