सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (20:29 IST)

निलेश राणे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा

भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.  ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत,’ असा टोला निलेश यांनी लगावला आहे. तसेच ‘अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे,’ असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
 ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आलीय,’ असा उल्लेख करत निलेश यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार नॉटरिचेबल झाले होते हा जुना दाखला देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असंही म्हटलं असून उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचंही म्हटलं आहे.
 
अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे.