रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

निळू फुलेंची मुलगी गार्गी राजकारणात, राष्ट्रवादीत प्रवेश

Gargi Phule in NCP ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत गार्गी फुले राष्ट्रवादीत सामील झाल्याची बातमी आहे.
 
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांनी सिनेमा आणि मालिका विश्वात अभिनय केला आहे. तरुणांनी किनाऱ्यावर न बसता राजकारणात यावं म्हणून मी राजकारणात आले असून जबाबदारी घेण्यास तयारी असल्याचे गार्गी यांनी जाहीर केले.
 
गार्गी फुले यांनी मुंबई युनिव्हर्सिटी तुन MA in Women Liberation या विषयात पदवी प्राप्त केली आहेत. 1998 पासून त्यांनी नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले. गार्गी यांनी आजवर तुला पाहते रे, राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, कट्टी बट्टी अशा गाजलेल्या मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत.