गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 मे 2023 (07:55 IST)

आरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले

Ramdas Athawale
वज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते शिर्डी येथून कार्यकर्त्यांना संबोधित होते.

अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नामदार आठवले म्हणाले, “महाविकास आघाडीचे सरकार वज्रमुठ बांधल्य़ाचे भासवत आहे. पण या आघाडीने सर्वांची लूट केली आहे. त्यांनी कितीहा वज्रमुठ बांधण्याचा प्रयत्न केला तरी भाजपक्षाचे सरकार त्यांच्या वज्रमुठीला घाबरत नाही. 2024 निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए लोकसभेत 350 जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल. आरपीआय पक्षाचे काम 32 राज्यात आहे. महाराष्ट्रात या पक्षाची मोठी ताकद असून आर.पी.आय पक्ष ज्या आघाडीसोबत राहतो त्याच पक्षाची सत्ता देशात येते.” असा दावा त्यांनी केला.

शिर्डी येथे सुरु असलेल्या आरपीआय पक्षाच्या दोन दिवस राष्ट्रीय अधिवेशनात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये पक्षाचे अध्य़क्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, यांच्याबरोबर नागालॅंडमधील नवनिर्वाचित आमदारांची उपस्थिती उल्लेखनिय होती. तसेच देशातील 20 राज्यातून आरपीआय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor