गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (21:42 IST)

नितेश राणेंच्या जामीनावर उद्या निकाल

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. परंतु दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने उद्या (बुधवार) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नितेश राणेंच्या जामीनावर निकाल देणार असल्याचे नमूद केले आहे. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंच्या वकीलांनी त्यांचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. या खटल्यात सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत आणि भुषण साळवी हे कामकाज पाहत आहेत. तर नितेश राणेंच्या बाजूने वकील संग्राम देसाई आणि सतीश मानेशिंदे हे बाजू मांडत आहेत.
 
दोन्ही पक्षांचा जामिनावर युक्तिवाद झाला. आमच्याकडून जामीनासाठी जोरदार विरोध करण्यात आला. आरोपी सहकार्य करत नसल्यामुळे आमचे मुद्दे तपासण्यात आलेले नाहीयेत. तसेच दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. आरोपांकडून कागद पत्राबद्दल आम्हाला जी माहिती घ्यायची आहे. ती माहिती घेण्याचं काम अद्यापही आमचं सुरू आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, अशी सध्याची वेळ नाहीये. तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहार दृष्टीपातळास आलेले आहेत. ते आम्ही तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर करणार आहोत. तसेच राणेंना जामीन मिळणार की नामंजूर होणार, याबाबत न्यायालय उद्या निर्णय घेणार असल्याचं प्रदीप घरत यांनी म्हटलंय.