रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (08:42 IST)

नितेश राणे म्हणतात, देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला वाचव

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सोशल मीडियावर मास्कचा वापरा संबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं. महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यातील हा व्हिडिओ असून, त्यांच्यासोबत या बैठकीमध्ये शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांचीही उपस्थिती होती. त्यावेळी राऊत यांना शिंक येताच त्यांनी तोंडावर लावलेला मास्क काढला आणि ते शिंकले. त्यांनी तोंडापुढे हात धरला. हाच व्हिडिओ राणेंनी पोस्ट करत, 'जरा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे, देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला वाचव' असं लिहिलं.