गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (09:42 IST)

'यांनी काय श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?'

'यांनी काय श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?', असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केली. याला प्रत्युत्तर दिले आहे.    
 
नितेश राणेंनी ट्विट करून,'बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते..जास्तच हवा भरलेली आज.. किती आव.. 'टाचणी’तयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन दया.., असं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
तर दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं,'दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट.. मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का? इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!'