शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:32 IST)

ओळखा मी कोण ?

1 कांचेची मी बनलेली, प्रत्येक रंगात येते 
शरीराने मी आहे गोल ओळखा मी आहे कोण ?

2 पाय असून मला चालता येत नाही ओळखा मी कोण ? 
 
3 तीन माझे हात पोट आहे गोल. 
मला बघून घाम पळतो आहे तरी मी कोण? 
 
4 छोटा सा गडू त्याला 
पाहून पाहून येतं रडू. 
 
5 लांबच लांब खोलच खोल, 
त्यातील पाणी गोडंच गोड. 
 
6 नाक माझे मोठे,
त्यानेच करतो मी सगळे कामं
ओळखा मी कोण आहे काय माझे नावं. 
 
7 वाचण्या आणि लिहिण्यासाठी मी येतो कामं,
पेन नाही कागद नाही सांगा माझे नावं. 
 
8 असे कोणते शब्द आहे,
 ज्यामध्ये फुलाचे आणि मिठाईचे नावं आहेत.
 
9 एका राजाची मी लाडकी राणी, 
हळू हळू पिते मी पाणी ओळखा मी कोण ?  
 
10 लांब आहे पण साप नाही,
बांधतात मला पण दोरी नाही 
ओळखा पाहू मी कोण? 
 
 
उत्तरे - 
बांगडी, टेबल, पंखा, कांदा, ऊस, हत्ती, चष्मा, गुलाब जामुन, दिवा, वेणी.