बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (16:06 IST)

शहीद वीरांगना महाराणी दुर्गावतीने अकबरला दिलं होतं चोख उत्तर

आपल्या देशामध्ये अश्या बऱ्याचश्या वीर आणि वीरांगनांच्या कहाण्या नाहीश्या केल्या गेल्या आहेत ज्यांनी मोगल आणि इंग्रेजांच्या विरुद्ध लढून विजय मिळवला. त्यापैकी एक होती राणी दुर्गावती. दुर्गावतीच्या वीर चारित्र्याला भारतातील इतिहासामध्ये कायम लक्षात ठेवले जाईल. अक्षरशः त्या देवी दुर्गाच्या सम होत्या. चला त्यांचा बद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
 
वीरांगना राणी दुर्गावतीचा जन्म 1524 मध्ये झाला. त्यांचे राज्य गोंडवाना येथे असे. महाराणी दुर्गावती या कालिंजरच्या नरेश किर्ती सिंह चंदेल याची एकुलती एक मुलगी होती. 
 
राजा संग्रामशाह यांचे चिरंजीव दलपत शहा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. दुर्दैवाने लग्नाच्या 4 वर्षांनंतरच राजा दलपत शहा यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा नारायण हा निव्वळ 3 वर्षाचाच होता. त्यामुळे राणीनं स्वतःच गढमंडळाची सत्ता सांभाळली. सध्याचे जबलपूर त्यांचा राज्याचे केंद्र होते. 
 
अकबरच्या कारा माणिकपूरचे सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खान यांनी अकबराला राणी दुर्गावतीच्या विरुद्ध भडकविले होते. अकबर इतर रजपूत घराण्याच्या विधवा बायकांप्रमाणेच राणी दुर्गावतीला आपल्या महालात आणू इच्छित होता. अकबराने आपल्या वासनेच्या तृप्ततेसाठी एका विधवा बाईवर अत्याचार केले. पण धन्य आहे या राणी दुर्गावतीचे सामर्थ्य की तिने अकबराच्या पुढे झुकण्यास नकार देऊन स्वतंत्रता आणि सन्मान मिळविण्यासाठी रणांगण निवडले आणि कित्येकदा शत्रूंचा पराभव करीत 1564 साली मरण पत्करले. 
 
त्यांच्या पश्चात त्यांचे दीर चंद्रशाह शासक झाले त्यांनी मोगलांची पराधीनता पत्करली.
 
राणी रुपमतीच्या प्रेमात आंधळा झालेल्या बाईवेड्या सुभेदार बाजबहादूर याने देखील राणी दुर्गावतीवर वाईट दृष्टी टाकली होती पण त्याला तोंडघशी पडावे लागले. दुसऱ्या वेळेस युद्धामध्ये दुर्गावतीने त्याचा पूर्ण सैन्याचा नायनाट केला तो परत कधी माघारी आलाच नाही. महाराणी ने 16 वर्ष साम्राज्य सांभाळले. या दरम्यान त्यांनी बरेच देऊळ, मठ, विहीर आणि धर्मशाळा बांधवल्या.