मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: जबलपूर , शनिवार, 21 मार्च 2020 (13:28 IST)

मध्यप्रदेशातही पोहोचला कोरोना, जबलपूरमध्ये चारजण पॉझिटिव्ह

देशभरात 50 नवे रुग्ण, केरळात सर्वाधिक 12
राजकीय अस्थिरता असलेल्या मध्यप्रदेशातही आता कोरोनाने शिरकाव केला. जबलपूरमध्ये विदेशातून आलेल्या चारजणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. यातले तीनजण हे एकाच कुटुंबातले आहेत. सर्वांना सुभाषचंद्र बोस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यातलेतीन जण हे जर्मनी आणि एकजण हा दुबईहून आला होता. तर भोपाळमधल्या एका हॉटेलमध्ये 4 संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे रिझल्ट अजुन यायचे आहेत, असेही सांगण्यात आले आहे.
 
देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात आज तब्बल 50 नव्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात सर्वाधिक संख्या ही केरळमधली असून त्यात 12 जणांचा सामावेश आहे. यामध्ये 5 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. मुन्नारमधल्या एका रिसॉर्टमध्ये ते थांबले होते. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला होता. कोची विमानतळावर असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. एर्नाकुलममध्ये 5, कारगौडमध्ये 6 तर पलक्कड जिल्ह्यात एकाचा समावेश आहे.