गयिका कनिका कपूरला करोनाची लागण
'बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली गयिका कनिका कपूरला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कनिका शुक्रवारी लंडनहून लखनऊला परतली आणि वैद्यकीय तपासणीत तिला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
लखनऊमध्ये चार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. हे चारही जण करोना पॉझिटिव्ह आहेत. यात कनिकाचाही समावेश आहे. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.