शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मार्च 2020 (22:55 IST)

कुणाचाही पगार कापला जाणार नाही: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही असे आश्वासन दिले. त्यांनी म्हटले की संकटाच्या या काळात आज दुपारी अशी समजूत झाली की अनेकांचे पगार कापण्यात येतील. मात्र आज मी तुम्हाला ग्वाही देतो की कुणाचाही पगार कापला जाणार नाही. फक्त काही टप्प्यांमध्ये त्याची विभागणी होणार आहे. वेतन कपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
करोनाशी लढण्यासाठी इतके हात पुढे येत आहेत. मग कुणाचाही पगार कसा काय कापला जाईल? करोनाशी लढल्यानंतर आर्थिक संकट येणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यात हा पगार दिला जाईल असं आश्वासन मी देतो असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.