गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जून 2025 (17:27 IST)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही विभागाचा निधी वळवलेला नाही, बावनकुळे यांची माहिती

Chief Minister's Beloved Sister Scheme
अलीकडेच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थखात्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी खात्याच्या मंजूर निधीतून 413 रुपये कोटींच्या निधीला कोणतीही पूर्व सूचना न देता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा आरोप केला.तसेच त्यांनी आरोप केला की, आदिवासी विकास खात्यातून 335 कोटी रुपयांचा निधी देखील अशाच पद्धतीने वळवण्याचा आला. 
शिरसाट यांनी हा सर्व प्रकार घटनेच्या तरतुदींना बाधक असल्याचे म्हट्ले आहे. विभागाची सरकारला सामाजिक न्याय विभागाची गरज नसल्यास विभाग बंद करण्याचे म्हटलं आहे. 
 
या वर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बुधवारी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही खात्याचा निधी वळवण्यात आलेला नाही. याआरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. कारण सामाजिक न्याय व आदिवासी विकास या सारख्या खात्यासाठी राखून ठेवलेला निधी वळवू शकत नाही.
अशा निधींसाठी कायदेशीर तरतुदी आहे. वितरणात काही वेळा विलंब होईल मात्र त्याचा अर्थ निधी वळवला गेला आहे असे नाही. सरकार अशा संवेदनशील विभागांसाठी ठेवलेल्या निधींमध्ये हस्तक्षेप किंवा गैरवापर करणार नाही. 
मुख्यमंत्री फडणवीसांनी या पूर्वी देखील स्पष्ट केलं होतं की, माझी लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभदायक योजना आहे. बजेट नियमांनुसार तिच्या निधीची नोंद सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्यांत करावी लागते. त्यामुळे निधी वळवल्याचा आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit