बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (14:57 IST)

शिवसेनेत कोणीही नाराज नाही

शिवसेनेचे 17 आमदार नाराज असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून जाहीर नाराजी व्यक्त केल्याच्या वृत्ताचे शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी खंडन केले आहे. शिवसेनेत कोणीही नाराज नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ही बातमी आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेचे 17 आमदार नाराज असून या आदारांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासोबत 'मातोश्री'वरजाऊन त्यांची नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या वृत्ताचे खंडन केले. शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचे वृत्त खोटे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण  करणारी ही बातमी आहे. सत्तास्थापनेचा सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांनाच देण्यात आलेला आहे.