शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (16:41 IST)

'त्या' माजी नौदल अधिकाऱ्याने घेतली राज्यपालांची भेट, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी

शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेट घेतली. यावेळी राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
 
मदन शर्मा यांना भेटीनंतर बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर अधिक कठोर कलमं लावालीत अशी मागणी केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई करु असं आश्वासन दिलं आहे”. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “मारहाण करताना शिवसैनिक आपण आरएसएस आणि भाजपाचा चमचा असल्याचा उल्लेख करत होते. आपण माजी नौदल अधिकारी असून कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्याबद्दल त्यांच्या मनात कोणी गैरसमज पसरवला आहे याची माहिती नाही”.