गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (08:36 IST)

आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे : खडसे

"माझ्या मागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन असं मी गंमतीनं म्हटलं होतं. तुमच्या मागे ईडी लागली तर असा प्रश्न जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना विचारला होता. तेव्हा माझ्यामागे ईडी लागल्यास सीडी लावणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता खरंच मागे ईडी लागली. पण आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं. 
 
"ज्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा जयंत पाटील यांनी तुमच्या मागे ईडी लागू शकते अशी शक्यता व्यक्त केली. त्यावर बोलताना मागे ईडी लागल्यास मी सीडी लावेन असं म्हटलं होतं. परंतु आता माझी प्रत्यक्षात ईडीची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचं काम करणार आहे," असं म्हणत खडसे यांनी भाजपला इशारा दिला.