रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (07:26 IST)

ओमनी कार पलटी होऊन युवती ठार, ६ जण गंभीर जखमी

accident
नाशिक  गंगापूररोडवरील गंमत जंमत हॉटेलजवळ एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव मालट्रकने हुलकावणी दिल्याने ओमनी कार पलटी झाली आहे. या अपघातात १ युवती ठार आणि ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ठार झालेल्या युवतीचे नाम कोमल सिंग असे आहे.
नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड वरील हाॅटेल गंमत जमत भागात हा अपघात झाला. या अपघातात तीन मुली आणि चार तरूण असे एकूण ७ जखमी झाले होते. सर्व जखमी हे ओमनी कार मधून प्रवास करीत होते. त्याचवेळी समोरून भरधाव आलेल्या मालट्रकने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाला. ओमनी पलटी झाल्याने सातही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील कोमल ओमप्रकाश सिंग (वय १८, रा. पाईपलाईन रोड, गंगापूररोड) हिला डोक्याला आणि छातीला मोठा मार बसला. त्यामुळे या युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.
 
जखमींची नावे अशी हेमंत कमलाकर गायकर (वय २०), वैष्णवी मडळकर (वय २०), तन्वीर मन्सुरी (वय २९, रा. पखाल रोड), विकास धनागळे (वय २०), नेहा असरलीलाल सोनी (वय २८). यातील बहुतांश जणांना डोके आणि छातीला मार लागला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.