गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (15:23 IST)

सिंदखेडराजात जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊ प्रेमींचा जनसागर लोटला

rajmata jijau
बुलढाणा : आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. त्या निमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत हजारोच्या संख्येने भाविक जिजाऊंना नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले. राजमाता जिजाऊंना मान वंदना देण्यासाठी  सकाळ पासून भाविक रांग लावून आहे. 

लाखोजी धाव यांच्या राजवाड्यात जिजाऊ जयंती उत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला. वाड्याला पुष्पहारांनी सजवण्यात आले, विद्युत रोषणाई करण्यात आली असून जय जिजाऊ,जय शिवराय अशा घोषणा करण्यात आल्या. या निमित्त लाखोजी जाधवच्या वंशजांनी राजमाता जिजाऊंना वंदन करत आरती केली. वाड्यात आतिषबाजी केली. 

या प्रसंगी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंदखेडराजा येथील जिजाऊ मातांच्या जन्मस्थळी वंदन करत नतमस्तक झाले. त्यांनी राजे लखुजी जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. 

Edited by - Priya Dixit