गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (13:21 IST)

घाटी रुग्णालयात महिला डॉक्टरला रॉडने मारले

दोन गटांमध्ये हाणामारी होऊन घाटी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरला डोक्यात लोखंडी रॉड ने हाणामारी केल्याची घटना छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, घाटी रुग्णालयात रात्री 8 च्या सुमारास दोन गटात रुग्णालयाच्या बाहेर हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटातील एक सदस्य जखमी झाला त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असताना 8-10 जणांनी रुग्णालयात घुसून रुग्णाला लोखंडी रॉड ने मारहाण करायला सुरु केले असता हा लोखंडी रॉड उपचार करत असलेल्या एका महिला डॉक्टरांच्या डोक्याला लागला आणि त्या जखमी झाल्या. घाटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले असून रुग्णालय प्रशासनने तातडीनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच घटनेचा निषेध म्हणून डॉक्टरांनी काम बंद करत निषेध केला. मात्र रुग्णालय प्रशासनाने निवासी डॉक्टरांची समजूत काढत पुन्हा काम सुरु केलं. या प्रकरणी  रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी त्यांनी काहीच केले नाही. टवाळखोरांना रोखलं नाही तर केवळ बघत होते.रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit