शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (12:20 IST)

सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटला,विद्यार्थी संतप्त

Paper leak
सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्यापीएचडी फेलोशिपसाठी घेतला जाणारा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी 10 जाणेउत्र्य रोजी हा पेपर घेतला जात असताना पेपर सुरु झाल्यानंतर काही वेळातच हा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आहे.

पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता परीक्षेत प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स प्रत देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.तसेच प्रश्न पत्रिका सी आणि डी सील नसल्याचे देखील लक्षात आले.

विद्यार्थ्यांनी पुणे, नागपूर, आणि छत्रपती संभाजी नगर येथे परीक्षेवर बहिष्कार टाकला. परीक्षेत अशा प्रकारचे गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहे. विद्यार्थ्यां कडून परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप देण्याची मागणी केली जात आहे.   
 
 Edited by - Priya Dixit