सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (17:28 IST)

फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच खोक्यांची पळवापळवी

devendra fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजी नगर येथील कार्यक्रमात मेडिकल कीट मिळवण्यासाठी गोंधळ उडाला. येथे लाभार्थ्यांनी चांगलीच धक्काबुक्की केली आणि पळवापळवी झाल्याचं पहायला मिळाले. आश्चर्य म्हणजे फडणवीसांचे भाषण सुरु असतानाच हा प्रकार घडल्याने कार्यक्रमाचा फज्जा उडाला. 
 
आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात विविध साहित्य वाटपाचा आणि विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार होते. यावेळी फडणवीसांचे भाषण आणि नंतर लाभार्थांपैकी कामगार, खेळाडू आणि सर्वसामान्यांसाठी विविध प्रकारच्या कीटचे वाटप करण्यात येणार होते. मात्र हा कार्यक्रम संपण्यापूर्वीच फडणवीसांचे भाषण सुरु असतानाच हे कीट पळवापळवी सुरु झाली. 
 
काही लोकांनी तर कीट ठेवलेल्या ठिकाणीच मांडवाचे पत्रे काढून वाट निर्माण केली. खोके आणि पेट्या पळवल्या. दरम्यान काही लोकांनी एकमेकांना हाणामारी देखील केली. कार्यक्रामत कुपन आणि क्रमांक या प्रमाणे कीट वाटप करण्यात येणार होते पण काही लाभार्थ्यांसह इतर नागरिकांनी या कीट्सची पळवापळवी केली.