सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (14:44 IST)

लग्नाच्या सहाव्या दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

लग्न करून मुलगी घराचे माप ओलांडून तिच्या सासरी येते. नववधूची स्वप्नं वेगळीच असतात. वैवाहिक बंधनात बांधलेले हे नवीन जोडपे नवीन संसाराची स्वप्ने पाहतात आणि त्याप्रमाणे आपल्या नवजीवनाची सुरुवात करतात. मात्र काही वेळा माणूस विचार एक करतो आणि घडतं वेगळंच. असेच काहीसे घडले आहे पुण्याच्या बारामती तालुक्यातील माळेगाव येथे. 
 
मालेगावातील येळे कुटुंबात मुलाचे लग्न होते. घरात मांडव उभारला होता. लग्न करून वरात थाटामाटाने घरी आली. मात्र लग्नघरातील आनंद शोकाकुल वातावरणात बदलले.लग्नाच्या सहाव्या दिवशी  कुटुंबातील नवरदेव सचिन उर्फ बबलू याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या घटनेमुळे माहेर आणि सासरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या मांडवात नवऱ्याचे मृतदेह ठेवण्याची दुर्देवी वेळ या कुटुंबियांवर आल्याने  गावात शोककळा पसरली आहे. 

Edited By - Priya Dixit