शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (21:22 IST)

तिस-या सोमवारी एसटीच्या २३० जादा बसेस

st buses
तिस-या श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने १४ व १५ ऑगस्ट रोजी २३० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. रविवार व सोमवारी या बसेस जुने सीबीएस बस स्थानकावरुन सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या व्यवस्थापकांनी दिली. या माहितीबरोबरच जुने सीबीएस या बस स्थानकावरुन अगोदर सुरु असणारी नियमीत बससेवा या दोन दिवसांसाठी महामार्ग बसस्थानकावरुन होणार आहे. यात सटाणा, साक्री, नंदुरबार, नवापूर, कळवण, सुरगाणा, स. गड, पेठ, ननाशी, राक्षसभुवन, केलावणं, ओझरखेड, बाफनाविहीर, ठाणापाडा, हरसूल, बालापाडा, पिपंळगाव, शिवणगाव, गणेशगांव, धुमोडी, बेजे, इंगतपुरी, कुशेगाव, घोटी येथे जाणा-या बसचा समावेश आहे.