मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)

पुन्हा एकदा आंबोली घाटात ब्लॅक पँथर दिसला

आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्या बिबट्या (ब्लॅक पँथर)चे दर्शन झाले. सुमारे 7 वर्षांपूर्वी याच आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले होते.
 
शनिवारी सावंतवाडी शहरातील काही युवक या घाटातून कारने प्रवास करत होते. यावेळी पूर्वीचा वस येथे रस्त्याशेजारी उभा असलेला हा काळा बिबटा त्यांना दिसला. बिबट्याला गाडीची चाहुल लागताच तो दरीत उडी टाकून गायब झाला. आंबोली परिसरात  ब्लॅक पँथरचा वावर असल्याबाबत वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनीही दुजोरा दिला. 
 
या जातीचा बिबट्या प्रामुख्याने घनदाट जंगलात वावरतो. खुल्या परिसरात तो क्वचितच येतो, शिवाय त्याचा काळा रंग वनराईशी मिळता-जुळता असल्याने त्याचे अस्तित्व पटकन जाणवत नाही. यामुळे ब्लॅक पँथर शक्यतो माणसाच्या दृष्टीपथास पडत नसल्याचे पुराणिक यांनी सांगितले.