बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (16:20 IST)

सीबीआयने लोकांना सांगावे, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल द्यावा : अनिल देशमुख

सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या हे कोडे तीन महिने लोटले तरीही सुटलेले नसून राजकारणाचे वादळही शमलेले आहे. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा मृत्यू ही हत्या नव्हती असे म्हटल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने आता लोकांना सांगावे, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे. 
 
अनिल देशमुख नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना सुशांतच्या एम्स अहवालावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आमच्याकडे अधिकृत माहिती नाहीय. जशी माहिती मिळेल तशी आम्ही ती कळवू. यामुळे यावर काही वक्तव्य करणे उचित नाही. सीबीआय जी चौकशी करत आहे, तिचा अहवाल लवकरात लवकर यावा, लोकांच्या समोर यावा, यामुळे लोकांनाही सुशांतची हत्या की आत्महत्या ते समजेल, असे देशमुख म्हणाले.