1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. One more relief for Mandakini Khadse, no arrest till September 16

मंदाकिनी खडसे यांना पुन्हा एकदा दिलासा, १६ सप्टेंबरपर्यंत अटक नाही

court
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायमूर्ती भारती डोंगरे यांनी त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.
 
मंदाकिनी खडसे या ईडीला चौकशीत सहकार्य करत आहेत. त्यांनी वेळोवेळी चौकशीसाठी हजेरी लावली आहे. याची नोंद घेत त्यांना दिलेला अंतरिम दिलासा न्यायालयाने कायम ठेवला आहे अशी माहिती खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी दिली.
 
पुण्यातील भोसरी जमीनप्रकरणी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात ईडी चौकशी सुरू आहे. ईडीने याप्रकरणी खडसे कुटुंबीयांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही समावेश आहे. 
पुढील लेख
सर्वोच्च न्यायालयानेच शिंदे-फडणवीस कॅबिनेटचा 'तो' निर्णय रद्द केला