OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा बॉम्बसारखा स्फोट, यूजर गंभीररित्या जखमी
OnePlus चा लोकप्रिय स्मार्टफोन Nord 2 मध्ये स्फोटाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. गिझमोचीनाच्या रिपोर्टनुसार, फोनमध्ये स्फोट झाल्याची ही घटना महाराष्ट्रातील धुळे येथील आहे. स्फोटाच्या वेळी फोन युजर्सच्या जीन्सच्या उजव्या बाजूच्या खिशात ठेवण्यात आला होता. फोनमधील स्फोटाची काही छायाचित्रे सुहित शर्मा नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केली आहेत. शेअर केलेले फोटो पाहून हा स्फोट किती भीषण होता याचा अंदाज येतो.
फोनच्या खालच्या डाव्या बाजूला आग , ट्विटर यूजरने फोनच्या मागील बाजूचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. फोटो पाहून असे म्हणता येईल की फोनच्या खालच्या डाव्या बाजूने आग लागली. स्फोटाच्या वेळी हा फोन पारदर्शक TPU केसमध्ये होता आणि तो पाहता मोबाईल स्फोटानंतर खाली दोन भागात फाटला आहे असे दिसते.
या अपघातात तरुणाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे . मात्र, या अपघातात यूजर चा जीव वाचला ही दिलासादायक बाब होती. OnePlus Nord 2 मध्ये झालेल्या स्फोटाबाबत कंपनीने अधिकृत निवेदनही जारी केले आहे.
कंपनीने सुरू केली चौकशी
कंपनीने सांगितले की, 'आम्ही अशा घटना गांभीर्याने घेतो. आमची टीम युजर्सच्या संपर्कात आहे आणि आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आवश्यक तपशील गोळा करत आहोत. फोनमध्ये स्फोट कशामुळे झाला याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.