बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (12:16 IST)

१० वी च्या ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2019 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
अर्ज करताना काही शाळांना अडचणी येत असल्याचे समोर आल्याने, मंडळाद्वारे नियमित शुल्कासह अर्ज भरण्याकरिता माध्यमिक शाळांना मुदतवाढ दिली आहे. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच अर्ज भरावेत, अशा सूचना मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत. 
 
मंडळाने सुरवातीला परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाईन नियमित शुल्कासह भरण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर अशी मुदत दिली होती. मात्र, नव्या निर्णयानुसार शाळांना 16 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे