1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (08:08 IST)

त्र्यंबकेश्वराचे ऑनलाईन दर्शन सुरू

Online dershan
यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यासह जिल्ह्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत. त्यामुळे श्रावण महिना सुरु झाला तरी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या महादेवाचे दर्शन भाविकांना घेता आलेले नाही. त्यामुळे सोमवारपासून शिवभक्तांसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने ऑनलाईन दर्शन सुरू करण्यात आले. आता महादेव भक्तांना घरबसल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. ही आहे लिंक :  http://www.trimbakeshwartrust.com.
 
व्रतवैकल्यांचा महिना म्हणून श्रावण महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याने लाखोंच्या संख्येने देशासह राज्यभरातील भाविक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देवस्थान बंद असल्याने श्रावण तिसरा सोमवार उजाडून देखील भक्तांना आपल्या आराध्याचे दर्शन घेता आले नाहीय. यामुळे आता त्र्यंबकेश्वर देवस्थानाने भाविकांना महादेवाचे दर्शन व्हावे यासाठी सोमवारपासून ऑनलाईन दर्शन सुरू केले आहे. सोमवारी संध्याकाळी पाचवाजे नंतर हे दर्शन सुरू करण्यात येणार आले आहे. देवस्थान पदाधिकार्‍यांच्या वतीने अधिकृत लिंक देखील जाहीर करण्यात आली आहे.