बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (15:23 IST)

महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तरच आमची जास्त ‘ताकद’ – जयंत पाटील

महाविकास आघाडीमधीलतिन्ही घटक पक्षांची ताकद मोठी आहे. नुकतेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत  वेगळे लढल्याने काही ठिकाणी पराभव झाला. आम्ही तिघेही एकत्र लढलो तरच ताकद जास्त होते, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांत जिथे शक्य असेल तिथे आघाडी म्हणून लढू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले  आहे.
 
 कोरोना महामारीची परिस्थिती कमी झाल्याने सरकारकडून राज्यातील मंदिरे आजपासून खुली करण्यात आली आहेत.जयंत पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती  येथे दर्शन घेत आरती केली.यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंदिरे उघडण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे.त्याचा आम्हाला आनंद असून या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणार असल्याचं पाटील यांनी पुण्यात  सांगितले.
 
भाजपचा आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम आहे.आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांना न्यायालयाने न्याय दिला.उलटपक्षी लखीमपूर  येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्याकांडाला भाजप जबाबदार असून त्यामुळे शेतकरी पेटून उठला आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्या संदर्भात केलेल्या आरोपांवर विचारलं असता.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  कशाचीच कागदपत्रे दडवली नाही ते कधी कुठलीच कागदपत्रे लपवत नसल्याचं पाटील म्हणाले.