रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2024 (13:02 IST)

हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

orange
राज्यामध्ये अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा 40 च्या पुढे गेल्याने, राज्यामध्ये तापमानाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबई आणि ठाणे येथे हवामान खात्याने उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिलेला असून, यलो अलर्ट इतर राज्यातील इतर अनेक ठिकाणी देण्यात आला आहे. तसेच, उष्णतेची ही लाट आजदेखील अशीच असणार आहे व यामुळे अनेक ठिकाणी ऑरेंज तर अनेक ठिकाणी यलो अलर्ट सांगितला आहे. 
 
मुंबई मध्ये नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे कारण मुंबईमध्ये तापमान 40°C आणि किमान तापमान 26°C असणार आहे. तसेच शहरामध्ये व उपनगरांमध्ये तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. अहमदनगर, सातारा, नाशिक, सोलापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यामध्ये नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे कारण इथे देखील उष्णता भडकणार आहे. उष्णतेची लाट तीव्र होणार आहे, असा इशारा वर्तवला आहे. तसेच यलो अलर्ट दिला असून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. 
 
महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा मधील काही जिल्ह्यांमध्ये वादळवाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यवतमाळ, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, वाशिम, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह हलका पाऊस पडेल असे हवामान खात्याने संकेत दिले आहेत. 
 
उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिक हैराण झाले असून अनेकांना आरोग्याचा समस्या निर्माण होतांना दिसत आहेत. तसेच पुण्यात देखील उष्णतेची लाट तीव्र स्वरूपाची झाली आहे असून, कमाल तापमान 40 अंश सेल्सियस इतकं काल पुण्यातील तापमान होते. तसेच तीन दिवसांपर्यंत ढगाळ वातावरण देखील राहील. तसेच विदर्भात कमाल 39 अंश तर किमान 25 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. तसेच पुढील दोन दिवसांपर्यंत ते वाढू शकते असे देखील सांगण्यात आले आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशी सूचना हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 
 
राज्यामध्ये कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान खाते वेळोवेळी वातावरणाबद्दल सूचना देत असते. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट तर काही ठिकाणी अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यामध्ये पाऊस तर कोकणात प्रचंड उष्णतेची लाट असा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची संभावना आहे. 
 
तसेच हवामान खात्याने देशातदेखील अनेक राज्यांमध्ये अलर्ट सांगितला आहे. मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश येथे पावसाची ह्क्यता वर्तवली आहे. तर पुढच्या चार दिवसांपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

Edited By- Dhanashri Naik