बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (17:06 IST)

स्वप्नात देखील मी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे बडबडायचो

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ता संघर्षाचा अनुभव दिल्‍लीत सांगितला.  मी मात्र सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असे म्‍हणायचो. एवढेच काय तर स्वप्नात देखील मी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे बडबडायचो, असे संजय राऊत यांनी सांगितले. 
 
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे एकत्र स्नेहभोजन ४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होत. यावेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा अनुभव सांगितला. 
 
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. आता देशातील इतर राज्यातले नेते ही म्हणत आहेत की 'ये हमारे यहा भी हो सकता है. हा 36 दिवसांचा जो राजकीय खेळ होता, तो कमिटमेंटचा खेळ होता. शरद पवारांवर माझा पूर्ण विश्वास होता. शरद पवारांनी एकदा गोष्ट मनावर घेतली तर ते ती पूर्ण करतात यावर आमचा विश्वास होता.