गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (16:57 IST)

गोव्यात आम्ही नवीन सरकार बनवणार : संजय राऊत

We will form a new government in Goa: Sanjay Raut
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांनी शिवसेनेकडून चाणक्याची भूमिका निभावली. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना गोव्यात देखील नव्या आघाडीची स्थापना करण्याच्या तयारीत आहे. ‘गोव्यात नक्कीच भूकंप होईल. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ३ आमदार आमच्या संपर्कात आहेत. विजय सरदेसाई त्यांच्या आमदारांसोबत इथे हजर आहेत.
 
त्यांच्यासोबत आघाडी करून शिवसेना एक नवीन फ्रंट करत आहे. लवकरच गोव्यात आम्ही नवीन सरकार बनवणार आहोत. गोवा सरकारला पाठिंबा देणारे इतर काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. सुधीर ढवळीकरांसोबत आमचं बोलणं झालं आहे.’, असं राऊत यावेळी म्हणाले. त्यामुळे भाजपमधल्या धुरीणांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील.