रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

संजय राऊत यांनी आभारही मानले आणि टीकाही केली

महाविकास आघाडीच्या या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करुन या दोघांचे आभार मानले आहेत.
 
पहिल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की शिवसेनेच्या मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्षच राहणार नाही असा दावा करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते पदी निवडले गेले याबद्दल त्यांचे अभिनंदन या आशयाचे दुसरे ट्विट केले आहे.