रविवार, 4 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (16:33 IST)

सरकारची बहुमत चाचणी उद्या होणार

The government's majority test will be held tomorrow
विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद हे आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेलं आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार? याची चर्चा चांगलीच रंगली होती. ज्यानंतर आता हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे.
 
दिलीप वळसे पाटील हंगामी अध्यक्ष झाले आहेत. आता शनिवारी अर्थात उद्या सकाळी कामकाज सुरु झाल्यावर होणार घोषणा केली जाणार त्यानंतर मंत्र्यांचा परिचय होणार. परियचानंतर विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस नेमणूक केली जाणार त्यानंतर बहुमत चाचणी होणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.