गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 जानेवारी 2024 (12:26 IST)

Pandharpur : तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

water death
दोन सक्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात घडली आहे.गणेश नितीन मुरकुटे(7) ,हर्षवर्धन नितीन मुरकुटे(8) आणि मनोज अंकुश पवार(11)अशी या मयत मुलांची नावे आहे. 

हे तिघे खेळता -खेळता शेततळ्याच्या पाण्यात उतरली आणि त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडाली. हे तिघे संध्याकाळी परतली नाही म्हणून ह्यांचा शोध घेण्यासाठी आईवडील बाहेर पडले तेव्हा त्यांच्या मृतदेह जवळच्या शेततळ्यात आढळला.मृतदेह पाहतातच आईने टाहो फोडला. त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
Edited By- Priya Dixit