'पुन्हा रॅम्प वॉक करीन'; पंकजा मुंडेंचे टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे या त्यांच्या राजकीय भूमिकांसोबतच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सहभागामुळेही चर्चेत असतात. मुंबईत पंकजा ताईंनी एका फॅशन सजाव मध्ये वॉक फॉर अ कॉज या कार्यक्रमात रॅम्प वॉक केले. त्यांच्या रॅम्प वॉकवरून काही जणांनी टीका केली होती. या टीकेला आता पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
'पुन्हा रॅम्प वॉक करीन', असे ठाम विधान करत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी हे रॅम्प वॉक जालन्यातील महिलांच्या साडीच्या कामाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी केल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या कामाला ऑर्डर मिळतील का या साठी केलेले हे प्रयत्न होते.
एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यावरून अनावश्यक टीका करणे योग्य नसल्याचा संदेश त्यांच्या या प्रतिक्रियेतून मिळतो. सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून मंत्र्यांकडून एखाद्या ब्रॅण्डसाठी पुढाकार घेऊन त्यात सहभागी होणे कितपत योग्य आहे या वर चर्चा सुरु आहे. जालन्यातील महिलांच्या हितासाठी मला पुन्हा रॅम्प वॉक करावं लागलं तर मी पुन्हा करेन असं ठळक शब्दांत त्यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या रोखठोक उत्तराची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

