1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (07:37 IST)

पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भाजपबरोबर आल्याने सोमय्या यांची पंचाईत झाली

Kirit Somaiya
Pawars alliance with BJP सोमय्या यांनी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ , हसन मुश्रीफ आधी नेत्यांविरोधात सिंचन गैरव्यवहार, राज्य सहकारी बँक, साखर कारखान्यातील गैरव्यवहार गेली अनेक वर्षे जोरदार आघाडी उघडली होती. अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. सिंचन गैरव्यवहार प्रकरणी काही अधिकारी आणि अजित पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांकडेही छापे टाकून चौकशी केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधातही सोमय्या यांनी मोहीम चालविली. मुश्रीफ यांच्याबरोबर चांगलीच जुंपली होती आणि सोमय्या यांना पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून मुंबईतच रोखले होते.
 
मुश्रीफांची ईडी कारवाईतून सुटका ?
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. ईडीकडून मुश्रीफांविरोधात ३५ कोटी रुपयांचा आर्थिक अफरातफरीचा (मनी लाँड्रिंग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर ईडीकडून तीन वेळा छापे टाकण्यात आले आहेत. मुश्रीफ यांच्या त्यांच्या तिन्ही मुलांमागेही ईडीचा ससेमिरा सुरु आहे. मुश्रीफांविरोधात कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात १०८ तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे.