शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (10:04 IST)

राज्यात लवकरच या शहरात पिंक रिक्षा योजना सुरु होणार-अदिती तटकरे

Pink rickshaw
महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी लवकरच राज्यात काही महत्त्वाच्या शहरात पिंक रिक्षा योजना सुरु होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील दालनात विविध विभागांच्या योजनेचा आढावा घेत असताना दिली. 

त्या म्हणाल्या ही योजना परिपूर्ण करावी.या मध्ये लाभार्थीची निवड, ई-रिक्षेला प्राधान्यता, बँकांची निवड करणे, प्रशिक्षण देणे अशा सर्व गोष्टी नीट तपासून घ्यावे. ही योजना राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरु करणार आहे. ही योजना मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजी नगर, ठाणे आणि नागपूर येथे सुरु करण्याचे आहे. 
 
मंत्रालयातील दालनात महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतांना त्यांनी या योजनेची माहिती दिली. या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सह आयुक्त राहुल मोरे उपस्थित होते.   

Edited by - Priya Dixit